आयसीसीने एका मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे की, "खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल सिद्रा दोषी आढळली आहे. हा उल्लंघन 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा खेळादरम्यान वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अनादर करणे' याच्याशी संबंधित आहे. पाकिस्तानच्या 40 व्या षटकात स्नेह राणाने बाद केल्यानंतर तिने तिच्या बॅटने जोरात खेळपट्टीवर प्रहार केला
मैदानावरील पंच लॉरेन एगेनबॅग आणि निमाली परेरा, तिसरे पंच करिन क्लास्टे आणि चौथे पंच किम कॉटन यांनी हे आरोप लावले. "लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी किमान दंड म्हणजे अधिकृत फटकार, कमाल दंड म्हणजे खेळाडूच्या सामना शुल्काच्या 50 टक्के आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स," असे आयसीसीने म्हटले आहे.