भारताने एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. यासह भारताने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने हे लक्ष्य 19.1 षटकांत तीन विकेट्स गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने 12 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका जिंकली
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 99 धावा केल्या होत्या. 35 धावा करणारा क्लासेन संघातील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याच्याशिवाय केवळ दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या 49 धावांच्या जोरावर सात गडी राखून सामना जिंकला. भारताने 19.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. श्रेयस अय्यरने षटकार मारून सामना संपवला. यासह भारताने वनडे मालिका 2-1 ने जिंकली. भारताने 12 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.