पहिल्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. पहिल्या 3 सामन्यांसाठीच्या 18 जणांचा संघामध्ये जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला विश्रांती दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कुमारला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही. संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोन यष्टीरक्षकांना स्थान दिले आहे.  
 
पहिल्या 3 कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ
 
विराट कोहली  (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उप-कर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती