IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (17:48 IST)
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या मध्यावर ऑस्ट्रेलियातून परतणार आहेत. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ते ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर भारताच्या ऐतिहासिक विजयात गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने जसप्रीत बुमराहच्या साथीने भारतीय संघाला विजयापर्यंत नेले
 
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयानंतर तो आता कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतणार आहे. जर सर्व काही ठीक झाले तर तो दुसऱ्या कसोटीपूर्वी परतेल. भारताने पर्थमध्ये 295 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ बुधवारी कॅनबेरा येथे जाणार आहे, जिथे त्यांना दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळायचा आहे. मात्र, या सराव सामन्यासाठी गौतम गंभीर संघाचा भाग असणार नाही. शनिवारपासून सराव सामना सुरू होणार आहे.  दुस-या कसोटीत रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे पुनरागमन होऊ शकते. 
Edited By - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती