भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये सुरू आहे. भारतीय संघाचा दुसरा डाव सुरूच आहे. पहिल्या डावातील खराब फलंदाजीनंतर, भारतीय सलामीच्या जोडीने शानदार कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात 150+ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावून टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत आणले.
याआधी सुनील गावस्कर आणि चेतन चौहान यांनी 1981 मध्ये मेलबर्न कसोटीत, 1985 मध्ये ॲडलेड कसोटीत गावस्कर आणि श्रीकांत आणि 1986 मध्ये सिडनी कसोटीत गावस्कर आणि श्रीकांत यांनी दोनदा अशी कामगिरी केली होती. आता यशस्वी आणि राहुलने हा पराक्रम केला आहे.