भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. तो 24 नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय संघात सामील होईल, म्हणजेच या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो पर्थमध्ये दिसणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने गुरुवारी ही माहिती दिली.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत या वेगवान गोलंदाजाने सांगितले की, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाने त्याला संघाचे नेतृत्व करण्याबाबत आधीच कळवले होते. याशिवाय त्यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत आपण रोहितशी आधीच बोललो होतो.भारतीय संघालाचारही सामने जिंकावे लागतील .