भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक

Webdunia
रविवार, 25 जून 2023 (10:04 IST)
अमळनेर:- देशातील अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत मंदिरांपैकी एक असलेल्या श्री मंगळग्रह मंदिरात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणेकर यांनी दि.२४ जून रोजी येऊन मंगलदाणींच्या चरणी नतमस्तक होत मनातील इच्छा आकांक्षा देवाकडे व्यक्त केल्या.श्री मंगळग्रह मंदिराविषयी ऐकले होते, त्यापेक्षाही येथील परिसर खूप सुंदर आणि आकर्षक असल्याचे ते म्हणाले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांनी श्री लोणकर यांना मंदिराविषयीची संपूर्ण माहिती देत संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य विषयीच्या उपक्रमा बद्दल सांगितले. यावेळी प्रदेश महामंत्री योगेश मेंद,प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवी ताई पलांडे, प्रदेश सचिव विजय बनसोडे, प्रदेश सदस्य किरण बोरडे, प्रदेश सदस्य अंकित संचेती, प्रदेश मीडिया संयोजक अमित सोलंके यांची देखील उपस्थिती होती.

संबंधित माहिती

पुढील लेख