विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने मुंबईला पराभूत करून स्पर्धेस विजयी सुरुवात केली आणि पहिल्या आठवड्याच्या शेवटी, आयपीएलच्या या मोसमातील हा संघ एकमेव अजेय संघ आहे. आरसीबी वगळता इतर सर्व संघांनी किमान एक सामना गमावला आहे. सनरायझर्स हैदराबाद हा एक असा संघ आहे जो अद्यापपर्यंत एकाही सामना जिंकू शकलेला नाही.
IPL Points Table: आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले गेले आहेत आणि त्या आधारे आरसीबी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर, एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला 6 विकेट्सने हरवून 8 व्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर पंजाब तिसऱ्या स्थानावरून सातव्या स्थानावर आहे. रोहित शर्माची मुंबई तिसर्याा, दिल्ली चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या आणि कोलकाता नाइट रायडर्स सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद सर्वात खालच्या स्थानी आहे.
IPL Purple Cap: आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 8 सामन्यांच्या आधारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हर्षल पटेलने सध्या पर्पल कॅप ताब्यात घेतला आहे. पटेलने दोन सामन्यांत सात गडी बाद केले आहेत. या यादीत कोलकाता नाइट रायडर्सचा आंद्रे रसेल दुसर्या स्थानावर 6 विकेट्ससह आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटलच्या आवेश खानने तिसऱ्या क्रमांकावर 5 बळी मिळवले.
IPL Oragne Cap: आयपीएलच्या 14 व्या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांच्या आधारे ऑरेंज कॅपवर सध्या कोलकाता नाइट रायडर्सच्या नितीश राणाचा कब्जा आहे. नितीशने आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये 137 धावा केल्या असून या यादीत अव्वल स्थान आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन १२3 धावांसह दुसर्याआ क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सनरायझर्स हैदराबादचा मनीष पांडे 99 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.