धक्कादायक ! ‘होम क्वारंटाइन’ असलेल्या तरूण पत्रकाराची हाताची नस कापून घेत आत्महत्या, वडिलांचा दोनच दिवसांपुर्वी झाला होता कोरोनामुळं मृत्यू

गुरूवार, 15 एप्रिल 2021 (21:06 IST)
होम क्वारंनटाइन असलेल्या एका तरुण पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरात उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
प्रकाश जाधव (वय 35 रा. सुशीलनगर, सोलापूर ) असे आत्महत्या केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. त्याने पत्रकार म्हणून दोन-तीन दैनिकांमध्ये काम केले होते. सध्या तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडीलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलीस असलेला भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आला. आई कोरोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रकाशने अनेक फेऱ्या मारल्या. मात्र हे इंजेक्शन त्याला मिळाले नव्हते. सध्या तो होम क्वारंटाइन होता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती