Canada News: कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात एका 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रथम वर्षाचा व्यवसाय व्यवस्थापन विद्यार्थी, याची रविवारी सारनियामध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थी आणि आरोपी दोघेही एकाच खोलीत राहत असून किचनवरून त्यांच्यात वाद सुरू होता. वाद इतका वाढला की आरोपीने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय विद्यार्थी गुरासिस सिंह यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच सारनिया पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेआणि गुन्ह्यामागचा खरा हेतू शोधण्यासाठी पुरावे गोळा करत आहे. कॉलेज प्रशासनानेही सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे.