चाणक्य नीती : जगातील सर्वात मौल्यवान 3 वस्तू

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (11:57 IST)
आचार्य चाणक्य हे खूप विद्वान, तत्वज्ञ, दूरदर्शी आणि रणनीतीकार होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती मध्ये ज्ञान आणि अनुभवाला साहित्य रूपात साठवले आहेत. हा नीती ग्रंथ जगासाठी एक अतुलनीय मार्गदर्शक आहे, ज्याचा मदतीने एखाद्याला यशाच्या उंच शिखरावर स्पर्श करता येईल. या नीतिशास्त्रात आचार्य चाणक्याने एका श्लोकात तीन गोष्टी जगातील सर्वात मौल्यवान वस्तू मानल्या आहेत. चला जाणून घेऊ या चाणक्याच्या मते अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या हिरे आणि माणिक पेक्षा देखील जास्त मौल्यवान आहे.
 
चाणक्य नीतीचे श्लोक -
पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् 
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते
 
म्हणजे पृथ्वीच्या सर्व रत्नांमध्ये पाणी, अन्न आणि गोड शब्द हेच सर्वात मौल्यवान रत्न आहे. यांच्या समोर हिरा, माणिक, पाचू आणि सोनं दगडा प्रमाणे आहेत. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पण पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे. म्हणून चाणक्याला हे माहीत होते की पाणी किती मौल्यवान आहे. पाण्याशिवाय जगणे माणसांसाठी शक्य नाही. 
 
अशा प्रकारे मानवी पोषणासाठी अन्न हे महत्त्वाचे आहे. पाणी आणि अन्नापासून माणूस आपल्या जीवनाचे संरक्षण करतो, या मुळे त्याचा जीवाचे रक्षण होतं, शरीराचे पोषण होतं आणि सामर्थ्य आणि बुद्धी वाढते.
 
या व्यतिरिक्त ते म्हणतात की गोड शब्दांमुळे एखादी व्यक्ती आपल्या शत्रूंवर देखील विजय मिळवू शकते आणि त्यांना आपलंसं करू शकते. म्हणून हे रत्न खूप मौल्यवान आहेत. 
 
चाणक्य म्हणतात की जो माणूस या रत्नांना सोडून दगडांच्या मागे धावत असतात, त्यांचे संपूर्ण आयुष्य दुःखात भरलेले असते. 
 
आचार्य चाणक्य म्हणाले आहेत की माणसाला फक्त 4 गोष्टींमध्ये आसक्ती असणे आवश्यक आहे. या 4 गोष्टींना सोडून जगातील प्रत्येक मौल्यवान वस्तू देखील त्यांचा समोर अपयशी ठरली आहे.
 
नत्रोडक समान दानं न तिथी द्वादशी समा
ना गायत्रीयः न पारो मंत्रें न मातुदेवत्वं परम
 
चाणक्यानुसार, जगामध्ये दान, एकादशी तिथी, गायत्री मंत्र आणि आईचे स्थान श्रेष्ठ आहे. दाना पेक्षा श्रेष्ठदान काहीही नाही. एकादशी तिथी पेक्षा श्रेष्ठ तिथी कोणतीही नाही. मंत्रां पैकी एक असे मंत्र आहे गायत्री मंत्र. जे सर्वात श्रेष्ठ आहे आणि पृथ्वीवर देखील आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. स्वतः देव सुद्धा नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती