चाणक्य नीती : आपण या 3 वाईट सवयी सोडा नाहीतर दारिद्र्य येईल

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (12:51 IST)
चाणक्य हे फार विद्वान व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांना विविध सखोल विषयांची माहिती होती. त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती. राजकारण आणि मुत्सद्दीपणात त्यांचे कौशल्य होते. त्यांनी आपल्या शहाणपणा आणि धोरणाच्या बळावर चंद्रगुप्ताला राजा म्हणून स्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी तक्षशिला येथून शिक्षण घेतले आणि तिथेच शिक्षक झाले. चाणक्य यांनी अर्थशास्त्र रचले. ज्यामुळे ते कौटिल्य बनले. चाणक्याची धोरणे माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. आपल्या धोरणांमध्ये चाणक्य यांनी अश्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा मुळे माणूस गरीब बनतो. म्हणून या वाईट सवयींचा त्याग कराव. 
 
* जे लोक घाणेरडे राहतात, स्वच्छ कपडे घालत नाही किंवा आपल्या भोवतीचे वातावरण घाण ठेवतात. सकाळी दात स्वच्छ करत नाहीत. देवी लक्ष्मी त्यांच्यावर कधीच प्रसन्न होत नाही. अशे लोकं नेहमीच दारिद्र्याचे जीवन जगतात. म्हणून माणसाला या वाईट सवयींना टाळावं.
 
* जे लोकं फार कर्कश आवाजात बोलतात किंवा कडू बोलतात. त्यांच्यावर देखील देवी आई लक्ष्मी कधीही आनंदी होत नाही. म्हणून आपण नेहमीच गोड बोलावे. गोड बोलणं ही एक चांगली सवय आहे. म्हणून कडू बोलण्याची सवय त्वरितच टाळावी. कडू बोलण्यामुळे आपापसातील नाती बिघडू शकतात आणि तो माणूस गरीब होतो.
 
* सूर्योदयानंतर कधीही झोपू नये. चाणक्यच्या मते, जे लोकं संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपतात. ते नेहमीच गरीब राहतात. शास्त्रामध्ये देखील संध्याकाळी झोपण्यास मनाई आहे. कारण संध्याकाळ हा देवी देवांच्या पूजेचा काळ असतो. या काळात झोपणाऱ्यावर लक्ष्मी देवी कधीही कृपा करत नाही. म्हणून चुकून देखील सूर्यास्तानंतर झोपू नये.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती