* वायफळ पैसे खर्चू नये - आचार्य चाणक्यानुसार, जे लोक आपला पैसे वायफळ खर्च करतात त्यांच्या घरात सौख्य आणि संपत्ती, धान्य येत नाही. नेहमी पैसे तेवढेच खर्च करा ज्याची गरज आहे. असे म्हणतात की पैसे वायफळ खर्च केल्याने धनाचा नाश होतो आणि देवी लक्ष्मी कोपते. पैसे खर्च न केल्याने घरात संपत्तीत भरभराट होते.
* संपत्ती वाढीस होण्यासाठी योजना आखा - चाणक्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती आहे तर ती फक्त साठवून ठेवू नये. तर त्या धनाचा व्यवस्थितरित्या वापर अश्या पद्धतीने करावे की त्या संपत्ती मध्ये वाढ होईल. ज्या ठिकाणी पैशात वाढ होईल अश्या ठिकाणी पैशाचा वापर करणे विवेकीपणाचे लक्षण असतात.
* धनाचे देव कुबेराची पूजा करावी - असे मानतात की कुबेर हे संपत्तीचे देव आहे त्यांचा मुळेच घरात संपत्ती, धान्य आणि सौख्य येतं. म्हणून घरात संपत्ती वाढवायची हवी असल्यास घरात नेहमी कुबेर देवतांची पूजा करावी जेणे करून कुबेर देव आपल्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील.
* आपल्या आर्थिक स्थितीसाठी मुलांकडून देखील सल्ला घ्यावा- चाणक्य म्हणतात की आपल्या घराच्या आर्थिक परीस्थितीला अधिक चांगले बनविण्यासाठी आपल्या मुलांचा सल्ला घ्यावा. या सह त्यांना आपल्या आर्थिक स्थितीची जाणीव करून द्या. असे केल्याने त्यांना हे कळेल की आपले पालक आपल्यासाठी खर्च करण्यास किती सक्षम आहे आणि आपल्याला आयुष्यात किती खर्च करावयाचे आहेत.