चाणक्याने मनुष्यावर परिणाम करणाऱ्या विषयांचा सखोल अभ्यास केला. चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोडपणा टिकून राहतो तो माणूस नेहमी आपल्या आयुष्यात यश मिळवत, याचा उलट वैवाहिक जीवनात वाद-मतभेद आणि तणाव असल्यास माणूस कितीही हुशार आणि सक्षम असलास, त्याचा जीवनात नेहमी निराशा असते. असे लोकं मानसिक सुख-शांती पासून वंचित राहतात.
* प्रत्येक लहान गोष्ट आपसात सामायिक करावी -
नवरा बायकोच्या नात्यात विचारांच्या देवाण-घेवाणमध्ये कोणत्या प्रकाराचा अडथळा येऊ नये. प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात नवरा-बायकोचे एकमत होणे आवश्यक आहे. या गोष्टींमध्ये कमी येऊ लागतातच नवरा बायकोतील संबंध कमकुवत होऊ लागतात.
* एकमेकांचा आदर करावा -
चाणक्याच्या मते, नवरा बायकोने एकमेकांचा आदर करावा. आदरात कमी येऊ लागल्यास हे पवित्र नातं कमकुवत होऊ लागतं. नवरा बायकोच्या नात्यात दोघांचा आदर समानच असतो, म्हणून कोणाच्याही सन्मानाला ठेच लागू नये.
* संकटाच्या वेळी एकमेकांना आधार द्या, एकमेकांसाठी सामर्थ्यवान बना -
चाणक्याच्या मते, संकटाच्या वेळी सेवक, मित्र आणि बायकोची किंवा नवऱ्याची ओळख होते. म्हणून संकटे आल्यावर एकमेकांना कधीही सोडू नये. ज्यावेळी नवरा बायकोच नातं बळकट होतं, त्यावेळी सर्वात मोठे संकट देखील निघून जातं. नवरा बायकोला एकत्ररीत्या सर्व संकटांना सामोरा गेले पाहिजे.