काय सांगता, कावळा आणि कोंबड्यासारखा स्वभावामुळे यश मिळू शकतं

मंगळवार, 26 जानेवारी 2021 (15:14 IST)
आचार्य चाणक्य एक महान शिक्षक असल्यासह अनेक विषयांचे चांगले जाणकार होते. चाणक्य यांना अर्थशास्त्राच्या व्यतिरिक्त राजकारण, नीतिशास्त्र च्या व्यतिरिक्त समाजशास्त्र यांचे ही विशेष ज्ञान होते. जीवनातील अनेक बाबींशी निगडित समस्यांचे स्पष्टीकरण देणारे चाणक्य म्हणतात की माणसाला यशस्वी होण्यासाठी कावळ्या आणि कोंबड्याच्या चांगल्या सवयी अवलंबल्या पाहिजे.
 
आचार्य चाणक्यने एका श्लोकाद्वारे प्रगतीचे सूत्र सांगितले आहे. या मध्ये कावळ्या आणि कोंबड्याच्या चांगल्या सवयींचे वर्णन केले आहे. चाणक्य म्हणतात की या सवयी अवलंबवल्यावर माणूस प्रगतीकडे वाटचाल करतो. चाणक्याच्या मते या गोष्टींमध्ये कधीही संकोच करू नका, प्रगती होण्यासह श्रीमंत होण्याचे मार्ग देखील मोकळे होतात. 
 
चाणक्य नीतीचे श्लोक -
प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बन्धुषु 
स्वयमाक्रम्य भुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् 
गूढ मैथुनचारित्वं काले काले च सङ्ग्रहम् 
अप्रमत्तमविश्वासं पञ्च शिक्षेच्च वायसात् 
 
चाणक्य नीतीनुसार, वेळेवर उठणे, युद्धासाठी तयार असणं, मित्रांना आणि प्रियजनांना त्यांचा वाटा देणं आणि कष्टाने कमाविणे. या चार चांगल्या सवयी माणसाला कोंबड्या पासून शिकाव्यात. या व्यतिरिक्त धीर ठेवणं, वेळ वाचवणं, नेहमी सावध राहणं आणि कोणावर देखील विश्वास न ठेवणं. या सवयी माणसाला कावळ्यापासून शिकाव्यात.
 
चाणक्याच्या मते ज्यांनी आपल्या आयुष्यात या चांगल्या सवयीला अवलंबवले, तो नेहमीच यशस्वी होतो. या सह अशे लोकं नेहमी पुढे वाढतात. चाणक्य म्हणतात की अश्या लोकांचे श्रीमंत होण्याचे मार्ग देखील सोपे होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती