महाराष्ट्रात लॉकडाउन, मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू, जाणून घ्या घोषणा

रविवार, 22 मार्च 2020 (16:33 IST)
करोना विषाणूचा वाढता फैलाव आणि त्यातून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असल्याने राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेतला गेला आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली गेली आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आज 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू आहे. पण हा संयम असाच कायम ठेवायचा आहे. म्हणून रात्री ९ वाजल्यानतंर बाहेर पडू नका. तसेच दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या आपल्याला थांबवायची आहे. हे लक्षात घेता उद्या सकाळपासून राज्यातील संपूर्ण नागरी भागात 144 कलम लावण्यात येत आहे. 
 
या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या-
रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद
मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद 
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील
सर्व प्रार्थनास्थळ भाविकांसाठी बंद
चाचणी केंद्रे वाढवणार
अन्न धान्यांचा साठा करू नका
गेल्या 15 दिवसांमध्ये विदेशातून आलेल्यांनी समाजात फिरू नये 
 
करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढतो त्यामुळे गरज भासल्यास लॉकडाऊन 31 मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती