सरकारनं दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी सर्व पाळाव्या सर्व बंद करायची वेळ आणू नका - मुख्यमंत्री

गुरूवार, 19 मार्च 2020 (16:58 IST)
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचं प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४९ रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली
 
घाबरून युद्ध जिंकलं जात नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. सरकारी यंत्रणा जिवाची परवा न करत लढत आहे. सरकारनं दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी सर्व पाळाव्या. राज्यात आवश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आहे. लोकल, बसमधील गर्दी ओसरली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. सरकारनं दिलेल्या सुचना पाळून लोकांनी गर्दी कमी करावी. सरकार काही गोष्टी बंद करू शकतं, पण तसं करण्याची सरकारची इच्छा नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
 
“करोनाचा व्हायरस हळूहळू वाढतोय. काळजीची गरज नाही परंतु नागरिकांनी सुचनांचं पालन केलंय. घाबरून जाऊन चालणार नाही. ज्याला हा आजार झालाय ती व्यक्ती अपराधी नाही. त्यांनी आपला परदेशवारीचा इतिहास लपूव नये. जर त्यांनी असं केलं तर ते चूक आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनची सुविधा सुरू करत आहोत. ज्यांच्यात करोनाची लक्षण आढळली त्यांच्यासाठी आयसोलेशनचीही सुविधा सुरू करत आहोत,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. “राज्यातील चाचणी केंद्र सुरू करण्यावर आज पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. तसंच आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय. राज्यातील चाचणी केंद्र वाढवण्यासही ते मदतीसाठी तयार आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती