भारतात कोरोना रुग्णांची संख्या १४७ पर्यंत पोहचली असली, तरी यापेक्षा भारताबाहेर अधिक भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. भारताबाहेर एकूण २७६ भारतीय कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक इराणमध्ये आहेत. इराणमध्ये २५५ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली.
इराणमध्ये सर्वाधिक २५५ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये ५ भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. या तीन देशांव्यतिरिक्त श्रीलंकेत दोन भारतीय कोरोनाग्रस्त आहे. याशिवाय हाँगकाँग, कुवेत आणि रवांडा या देशांत प्रत्येकी एक भारतीय कोरोनाबाधित आहे.