काहींना घरातील सदस्यांच्या सांगण्यावरून अनिच्छेने नावडता मार्ग निवडावा लागतो.तर काही मुलं कसलाही विचार न करता समोर जो मार्ग दिसेल तो निवडतात. त्यामुळे मुलांचे नुकसान होते.आणि हाती निराशा येते.एक चुकीचा निर्णय आपल्या पुढील आयुष्याला धोक्यात आणू शकतो. असं होऊ नये.म्हणून करिअरची निवड करताना काही गोष्टींची काळजी घेणं देखील महत्वाचे आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
3 मित्रांपायी आपले भविष्य पणाला लावू नका-बऱ्याच वेळा असे होते की मित्र ज्या क्षेत्रात ची निवड करतात आपण देखील त्याच क्षेत्राची मित्रांच्या सांगण्यावरून निवड करतो आणि त्यामुळे पुढील भविष्यामध्ये त्रास होतो.लक्षात ठेवा की प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. जसे की कोणाला कॉम्प्युटरची आवड असते,तर कोणाला इंजिनियरिंग ची ,कोणाला डॉक्टर बनायचे तर, कोणाला व्यावसायिक.म्हणून करिअर करायचे आहे.आपण देखील आपली आवड जाणूनच करिअर निवडा .मित्रांच्या सांगण्यावरून आपण आपली आवड बदलू नका.
5 करिअरच्या भविष्याची माहिती मिळवा -आपण ज्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले आहे.त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती मिळवा. त्या क्षेत्रात आपल्याला पुढे जाऊन कितपत फायदा मिळणार किंवा भविष्यामध्ये त्यापासून काय फायदे मिळणार ही सर्व माहिती घेऊनच करिअरच्या क्षेत्राची निवड करा.अन्यथा आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.