एलपीजी उपभोक्तांसाठी मोठी बातमी, आता स्वतःची डिस्ट्रीब्युटर निवडता येणार

गुरूवार, 10 जून 2021 (21:10 IST)
एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देत मोदी सरकारने त्यांना कोणत्या वितरकाकडून एलपीजी रिफिल पाहिजे आहे ते ठरविण्याचा पर्याय त्यांना दिला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चंदीगड, कोयंबटूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथील रहिवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यानंतर, हे लवकरच अन्य ठिकाणी सुरू केले जाऊ शकते. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने आज ही माहिती दिली आहे.
 
नवीन सर्व्हिसच्या माध्यमाने सरकार एलपीजी (LPG)ग्राहकांना डिस्ट्रिबटर निवडण्यापूर्वी त्यांच्या रेटिंगचे ऑप्शन देणार. हे पर्याय ग्राहकांना एलपीजी रीफिलिंग करवताना दिसेल. जेव्हा मोबाइल ऐप / कॉर्पोरेट पोर्टलच्या माध्यमातून एलपीजी रिफिलच्या बुकिंगसाठी लॉग इन कराल तेव्हा त्याने डिस्ट्रिब्यूटर सेलेक्शन ऑप्शन आणि डिस्ट्रीब्यूटर रेटिंग देखील दिसेल. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हे रेटिंग प्रदेशानुसार बदलू शकते. या सुविधेद्वारे ग्राहक स्वत: साठी सर्वोत्कृष्ट वितरक निवडू शकेल. यामुळे चांगल्या सेवा पुरवण्यासाठी वितरक कंपनीत स्पर्धा वाढेल, ज्याचा थेट ग्राहकांना फायदा होईल.
 
1 जून रोजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाल्यामुळे एलपीजीची किंमत दिल्लीत 122 रुपयांनी स्वस्त झाली. या कपातमुळे आपल्याला आनंदी होण्याची आवश्यकता नाही, कारण अनुदानित देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. ही कपात 19 किलो सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती