करिअर कसे निवडावे

बुधवार, 9 जून 2021 (18:42 IST)
कोणत्याही क्षेत्रात करिअरची निवड करताना काही गोष्टींना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.करिअरची निवड करताना अनेक विचार आपल्या मेंदूत चालत असतात.या पैकी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.चला जाणून घेऊ या.
 
1 आपली आवड आणि करिअर निवडण्याची क्षमता ओळखा-
करिअर निवडताना  स्वतःचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे .आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे?किंवा आपण त्या क्षेत्रासाठी सक्षम आहात का?जर आपल्या कडे त्या क्षेत्राशी संबंधित काही कौशल्य आहे तर आपण त्याच क्षेत्राची निवड करावी.
 
2 उपलब्ध संधींची यादी तयार करा-
आपल्याला आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळालेल्या व्यावसायिक संधीची यादी बनवा आणि त्या यादीं पैकी जे व्यवसाय आपल्यासाठी योग्य आहे त्याला चिन्हांकित करा.असं करण्यापूर्वी आपण आपल्या  वरिष्ठांचा सल्ला घ्यावा आणि अशा सहकार्यांचा  सल्ला घ्यावा जे आधीपासूनच अशा व्यवसायात आहेत इंटरनेट हे असे कार्य करण्यासाठी एक वरदान आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इंटरनेटवरून त्याबद्दल माहिती गोळा करा.
 
3 चांगला रेझ्युमे  बनवा-
एकदा आपण करिअरची निवड केली तर आपल्याला योजना यशस्वी करण्यासाठी चांगला रेझ्युमे बनवणे आवश्यक आहे.आवडीची नौकरी मिळविण्यासाठी चांगला रेझ्युमे बनवणे महत्वाचे आहे. रेझ्युमे महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून या साठी चांगली तयारी केली पाहिजे.
 
4 नवीन कौशल्ये शिका आणि विकसित करा-
कधी कधी आपली शैक्षणिक पात्रता आपल्या आवडीचा व्यवसाय करण्यासाठी पुरेशी नसते.व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन अतिरिक्त कौशल्ये असणे देखील आवश्यक आहे.अशा अल्प मुदतीच्या प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये जाण्यास अजिबात संकोच करू नका.नवीन काही शिका. आपल्या बोलण्याची पद्धत म्हणजे सादरीकरण करण्याची पद्धत माहित असणे आवश्यक आहे.शैक्षणिक कौशल्यांबरोबरच आपल्याकडे आपली स्वतःची अनौपचारिक कौशल्ये देखील असावीत. स्वत: चे मूल्यांकन करून योग्य मार्गाची निवड करून आपण यश मिळवू शकतो.नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण इंटरनेटचा वापर करू शकतो.
 
5 लहान लक्ष लक्षात ठेवा-
ध्येय सध्या करण्यासाठी स्वतःचे मूल्यांकन करणे ध्येयाच्या शिडीवर चढण्यासारखे आहे.आपल्या ध्येयाची विभागणी महिने,आठवडे,दिवस आणि तासात करा.हा  यश प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे.आपण तयार केलेल्या ध्येयावर आणि धोरणावर दररोज मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
 
6 आत्मविश्वास आवश्यक आहे-
करिअरची गोष्ट असो किंवा दैनंदिन जीवनातील कोणतेही कार्य असो,स्वतःवर विश्वास असणे महत्वाचे आहे.जर आपण एखादे काम करत आहात जे करताना आपल्याला स्वतःवर विश्वासच नाही की ते काम आपण पूर्ण करू शकाल किंवा नाही.तर त्या कार्यात यश मिळणं अवघड  आहे.मन लावून समर्पण भावाने केलेलं काम नेहमीच यशस्वी होत. कोणत्याही हेतूने केले काम आणि योग्य मार्गाची निवड करणे देखील आत्मविश्वासाने सहज आणि शक्य आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती