चेहऱ्यावर तजेलपणा वाढविण्यासाठी पुदिना वापरा

रविवार, 13 जून 2021 (09:00 IST)
उन्हाळ्यात पुदीना वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. उसाचा रस, चटणी बनवण्यासाठी, थंड बनवण्यासाठी आणि कधी कधी चहा पिण्यासाठी याचा वापर केला जातो. परंतु त्यात असलेले अँटी बेक्टेरिअल,अँटी इंफ्लिमेट्री आणि सुदींग गुणधर्म आहे.त्यात सॅलिसिलिक ऍसिड देखील आहे त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम होत नाही.
 
उन्हाळ्यात अन्नात याचा वापर केला जातो. त्वचेसाठी देखील हे फायदेशीर आहे.चला जाणून घेऊ या की पुदिना कसा वापरता येऊ शकतो.
 
1 फेस पॅक -पुदिन्याचा फेस पॅक  बनवून चेहऱ्यावर लावू शकतो. पॅक बनविण्यासाठी  ह्याचे पाने वाळवून वाटून घ्या आणि गुलाब पाण्यात मिसळून लावून घ्या आठवड्यातून किमान 3 वेळा असं करा असं केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटेल आपली इच्छा असल्यास आपण या मध्ये टोमॅटोचा गर देखील मिसळू शकता.
 
2 फेस वॉश-आपण पुदीना फेस वॉश त्वरित बनवून वापरू शकता. यामुळे चेहर्‍यावरील तेलकटपणा कमी होतो. यासाठी लिंबाचा रस, गुलाबाचे पाणी आणि पुदीना पाने भिजत ठेवा. तासाभरानंतर चेहरा धुवा. जर आपली त्वचा कोरडी असेल तर लिंबाऐवजी मध वापरा.
 
3 मुरुम - उष्णतेमुळे जर आपल्या चेहऱ्यावर मुरुम येत असेल तर आपण पुदीना चा फेस पॅक लावू शकता. पुदीना पावडरमध्ये हळद आणि गुलाबाचे पाणी मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती