अभिनेता इरफानचे किमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण

शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (09:11 IST)
अभिनेता इरफान खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या उपचाराविषयीचे काही अपडेट्स दिले आहेत. ‘किमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. सहा सेशन पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसऱ्या सेशननंतर केलेल्या स्कॅनचा रिपोर्ट सकारात्मक आला. तरीही सहा पूर्ण सेशन होईपर्यंत वाट पाहावी लागणार. कारण तेव्हाच निकाल लागेल आणि मग पाहुयात आयुष्य मला कुठे घेऊन जातं ते,’असं तो म्हणाला आहे.
 
‘आता मी कोणतेच प्लॅन्स करत नाही. कारण जीवनात कसलीच निश्चिती नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो. मग ते काही महिन्यांनी असो किंवा वर्षाने किंवा दोन वर्षांनी. इथे कसलीच शाश्वती नाही. पण या परिस्थितीने मला खूप काही शिकवलं आहे. तुम्ही आयुष्याच्या दुसऱ्या पैलूकडे पाहायला लागता. आयुष्य खूप काही देतं आणि यासाठी आपल्याला आभारी असायला हवं अस म्हणाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती