ईदच्या निमित्ताने कपिल शर्माने 'किस किस को प्यार करूं २' ची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्टरमध्ये कपिल शर्मा वराच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि सेहरा घातला आहे. त्याच्यासोबत निळ्या रंगाचा पोशाख घातलेली एक मुलगी उभी असलेली दिसते, जिचा चेहरा दाखवलेला नाही.
कपिल शर्माच्या या चित्रपटासाठी व्हीनस आणि अब्बास-मस्तान एकत्र आले आहेत. या चित्रपटात कपिलसोबत मनजोत सिंग देखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुकल्पा गोस्वामी करत आहेत. तर रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास मस्तान हे त्याची निर्मिती करत आहेत.