मनोज कुमार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सलीम खान, अमिताभ बच्चन, प्रेम चोप्रा, सुभाष घई, राज बब्बर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले. मनोज कुमार यांना अंतिम निरोप देताना, त्यांची पत्नी शशी गोस्वामी यांना अश्रू अनावर झाले. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण भावनिक झाले.