प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता व्हॅल किल्मर यांचे निधन

बुधवार, 2 एप्रिल 2025 (14:00 IST)
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता व्हॅल किल्मर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. किल्मर यांचे न्यूमोनियामुळे निधन झाले. व्हॅल यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांची मुलगी मर्सिडीज किल्मर यांनी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मर्सिडीजने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, किल्मर यांचे मंगळवार, 1 एप्रिल रोजी रात्री लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले.
ALSO READ: कपिल शर्मा पहिले सेलिब्रिटींची नक्कल करायचा, आता आहे सर्वात महागडा व लोकप्रिय कलाकार
व्हॅल किल्मर यांचे न्यूमोनियामुळे निधन झाले. 2014मध्ये, अभिनेत्याला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र, उपचारानंतर तो बरा झाला. अभिनेता व्हॅल किल्मरने 1984 मध्ये 'टॉप सीक्रेट' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'टॉप गन', 'रियल जीनियस', 'विलो', 'हीट' आणि 'द सेंट' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली.
ALSO READ: लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक
जो व्हॅल किल्मरच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये त्याने आइसमनची भूमिका साकारली होती. व्हॅल कोणतीही भूमिका अतिशय तीव्रतेने साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: व्हायरल गर्ल मोनालिसा हिला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती