इंस्टाग्राम पोस्टला लाईक करून पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी सागर यांना आपल्या जाळ्यात ओढले. फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेने व्हाट्सअप वरून सागर कारंडे यांना मेसेज करून संपर्क साधला आणि इंस्टाग्रामच्या काही पोस्ट ला लाईक करून पैसे मिळवण्याचे काम करून दिवसाला 6000 हजार रुपये कमवू शकाल असे सांगितले. सागरने हे काम करण्यास स्वीकारले आणि 10 वेळा त्याने काम केल्यास त्यांना 11 हजार रुपये मिळाले. या मुळे सागर यांचा या योजनेवर विश्वास बसला आणि त्याने काम सुरु ठेवण्यासाठी काही गुंतवणूक करून त्यासाठी 30 टक्के कमिशन मिळण्याचे आरोपी महिलेने सांगितले.