मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ही घटना घडली असून रेल्वे अधिकाऱ्याची फसवणूक करणाऱ्यांनी 20 तास व्हिडीओ कॉल वर ठेवले. 59 वर्षीय पीडित अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रधान मुख्य विद्युत अभियंता म्हणून काम करतात.
16 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना फोन आला, ज्यात पुढील दोन तासांत त्यांचा फोन ब्लॉक होणार असल्याची माहिती देण्यात आली. अधिक माहितीसाठी शून्य दाबा. त्याने शून्य दाबताच व्हिडिओ कॉल सुरू झाला. कॉलरने स्वत:ची ओळख सीबीआय अधिकारी अशी करून दिली आणि सांगितले की त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रेल्वे अधिकाऱ्याची चौकशी करायची आहे कारण त्याचा मोबाइल नंबर घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या बँक खात्याशी जोडलेला होता
पीडित व्यक्तीने सांगितले की या प्रकरणात त्यांच्या काहीच संबंध नाही. फसवणुक करणाऱ्याने सांगितले की तुमच्या नावी असलेल्या मोबाईल नंबर आहे त्याचा वापर मनी लॉन्डरिंग प्रकरणात वापरण्यात आलेल्या बँकेच्या खात्याशी जोडले आहे. नंतर पीडित आपल्या कार्यालयात गेले. कॉलरने पीडितला सांगितले की मी सीबीआय अधिकारी असून मला तुमची सखोल चौकशी करायची आहे. असं म्हणत त्याची संपूर्ण माहिती घेतली.
कॉलर ने पिडीतला सांगितले की आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.नंतर पीडित ला बँकेत नऊ लाख जमा करण्यास सांगितले. त्यांनी पैसे ट्रान्सफर केले नंतर त्यांना समजले की आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी बँकेच्या मॅनजरला ट्रॅन्जेक्शन तातडीनं थांबवण्यास सांगितले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. पीडित अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.