‘सत्यमेव जयते' अमृता खानविलकरचा पुढचा हिंदी सिनेमा

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ हा अभिनेत्री अमृता खानविलकरचा आगामी हिंदी सिनेमा आहे. या सिनेमात अमृताने ‘सरिता’ हे पात्रं साकारलं आहे जी पोलिस दलातील सेवेत असणाऱ्या एका व्यक्तीची पत्नी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने संरक्षण यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची पत्नी म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या तिने कशा रितीने पेलल्या आहेत आणि गृहिणी म्हणून एकंदरीत तिचा घरात असलेला वावर या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या पात्राचे वैशिष्ट्ये म्हणजे या पात्रामुळे अमृताचे खऱ्या आयुष्यातील राहणीमान, तिचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज येणार आहे. कारण जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच सरिताचा पण आहे.
 
मनोज बाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं हा अमृतासाठी अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे. त्याविषयीच अधिक माहिती देत अमृता म्हणाली, ‘मनोजजी जरी शिस्तप्रिय आणि रागीट दिसत असले तरी ते स्वभावाने खूप शांत आणि खोडकर स्वभावाचे आहेत.’ एकत्र सीनच्या दरम्यान मनोजच्या अभिनयात गुंग झालेल्या अमृताला ‘अगं लाईन घे…’ असं खुद्द मनोजनेच तिला भानावर आणलं. ऑफ स्क्रीनही सेटवर त्यांना अनेक प्रश्न विचारुन अमृताने इतकं हैराण केलं की मिश्किलपणे तिच्या खोडकरपणाविषयी सांगच ती सर्वांचीच मुलाखत घेते, असं तो म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती