'भारत'मध्ये झळकणार नोरा फतेही

बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (11:56 IST)
जॉन अब्राहमसोबत सत्यमेव जयते या चित्रपटात अभिनेत्री नोरा फतेही झळकणार आहे. पण अद्याप  तिचा हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तरी देखील तिच्या पदरात आणखी एक चित्रपट पडला असून सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. 
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या या चित्रपटात ती फक्त डान्स नंबर नाही तर एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याबाबत मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार नोरा चित्रपटात एका विदेशी मुलीची भूमिका साकारणार असून ती भारतमध्ये माल्टामधल्या लॅटिन मुलीची भूमिका साकारणार आहे. 
 
नोराच्या भूमिकेबाबत बोलताना दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाला की, ती चित्रपटात एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती 80च्या दशकातील भागात दिसणार आहे. तसेच ती सलमान खान आणि सुनीलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती