जगभरात कोरोना टाळण्यासाठी प्रतिकारक शक्ती बळकट करण्याचा सल्ला दिला जात आहे.जेणे करून शरीराला या विषाणूंची लढण्याची शक्ती मिळेल. आपल्या आहाराची काळजी घेण्यासह योगासन करणे देखील आवश्यक आहे. दररोज मोकळ्या हवेत योगासन केल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते हाडांना स्नायूंना मजबुती मिळून शरीराला शक्ती मिळते. हे 3 योगासन केल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते.
1 धनुरासन -
हे आसन करण्यासाठी शरीराला धनुष्याच्या आकारात दुमडतात.दररोज धनुरासन केल्यानं प्रतिकारक शक्ती बळकट होते आणि शरीर ताजेतवानं राहतो.या मुळे तणाव कमी होऊन आत्मिक शांती आणि आनंद मिळतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरून पोटावर झोपा. नंतर पायाला मागे दुमडून दोनी हाताने धरून ठेवा दीर्घ श्वास घेत छाती आणि पायाला हळू हळू वर उचला चेहरा समोर ठेवून पायाला आपल्या सामर्थ्यानुसार हाताने ओढा आपल्याला धनुष्याचा आकार बनवायचा आहे. काही वेळ त्याचा अवस्थेत राहून पुन्हा सामान्य स्थितीत या.
3 ब्रिज पोझ - हे आसन जमिनीवर पाठीवर झोपून करायचे आहे. हे आसन तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करतो.थॉयराइड असलेल्या रुग्णांसाठी हे आसन करणे फायदेशीर आहे. हे करण्यासाठी पाठीवर झोपा हात आणि खांदे सरळ जमिनीवर ठेवा. पायावर जोर देत आपल्या शरीराचे संपूर्ण भार टाका. शरीराला हळुवार उचलत गुडघे वरील बाजूस करा. या अवस्थेत 4 ते 5 सेकंद राहून दीर्घ श्वास घ्या नंतर सामान्य अवस्थे मध्ये येऊन या आसनाची पुनरावृत्ती करा.
3 वृक्षासन-
हे आसन करणे फायदेशीर आहे या मुळे स्नायूंना आणि हाडांना मजबूती मिळते. पाठीचा कणा बळकट होतो.प्रतिकारक शक्ती बळकट होते. शरीरात संतुलन राहून तणाव कमी होते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा एक गुडघा दुमडून पायाला दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवून संतुलन बनवा नंतर हाताला डोक्याच्या वर घेऊन जाऊन नमस्काराची मुद्रा करा. उभे राहून दीर्घ आणि लांब श्वास घ्या. काही वेळ याच अवस्थेत राहून पुन्हा सामान्य अवस्थेमध्ये या. अशा प्रकारे दुसऱ्या पायाने देखील हे आसन करा.