पावसाळा सुरु झाला आहे. तसेच आरोग्याच्या तक्रारी वाढतात, अश्यावेळेस योग्य काळजी घेतली नाही तर समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पावसाळ्यात अनेक ठिकाणी माश्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच माश्या अन्नातून विषबाधा, अतिसार आणि टायफॉइड सारखे अनेक आजार देखील निर्माण करतात. पावसाळ्यात त्यांचा प्रसार वाढतो. आम्ही तुम्हाला काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही माश्यांपासून मुक्ती मिळवू शकता. तर चला जाणून घेऊ या...
माश्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय
१. एक लिंबू घ्या व त्याचे दोन तुकडे करा. प्रत्येक तुकड्यात ४-५ लवंगा चिकटवा. हे तुकडे खिडक्या, दरवाजे किंवा स्वयंपाकघरात ठेवा. माशांना लिंबू आणि लवंगाचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या येणार नाही.