योगाच्या 4 चरणामुळे पातळ कंबर मिळवू शकता

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (20:15 IST)
पोट कमी करण्यासाठी तसेच कंबर पातळ करण्यासाठी योगाचे असे काही 4 चरण आहेत ज्यांना नियमितपणे केल्याने जलद गतीने फायदा होतो आणि कंबर देखील पातळ होईल. या साठी अधिक जेवण करणे आणि अनियमित खाण्याची वेळ टाळले पाहिजे.म्हणजे जेवण करण्याची वेळ निश्चित करायला पाहिजे आणि तेवढाच आहार घ्यावा जेवढे आपले शरीर सहज पचवू शकेल. चला योगासनांच्या टिप्स जाणून घेऊ या.    
 
1 कटी चक्रासन - हे करण्यासाठी सावधानमधे उभे राहा. दोन्ही हात कंबरेवर ठेवून कंबरेपासून  शक्य तितक्या मागे वाकून थांबा. श्वासाची गती सामान्य ठेवून डोळे बंद करा आणि काही काळ याच स्थितीमध्ये राहून परत या. 4-5 वेळा दोन्ही बाजूने ह्याचा सराव करा. 
 
2 पुन्हा सावधान च्या मुद्रेत उभे राहून उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या खांद्यावर प्रथम उजव्या बाजूने कंबरेपासून मागे वळा. मान देखील वळवून मागे बघा. श्वासाची गती सामान्य ठेवून डोळे मिटून घ्या. काही वेळा याच स्थितीत येऊन पुन्हा पूर्वस्थितीत या. 4 ते 5 वेळा दोन्ही बाजूने ह्याचा सराव करा. अशा प्रकारे डावी कडून करा. 
 
3 सावधान मुद्रेत उभे राहून हाताला पालटून हाताला वर उचलून समांतर क्रमात सरळ करा. श्वास घेत कंबरेला डावीकडे वाकवा. हात देखील डावी कडे ठेवा कंबर वाकवून थांबा .श्वासाची गती सामान्य ठेवून डोळे मिटून घ्या. काही वेळ त्याच अवस्थेत राहून परत या. 4 -5 वेळा ह्याचा दोन्ही बाजूने सराव करा. 
    
4 शवासनात झोपून दोन्ही हात समांतर क्रमात पसरवून घ्या. नंतर उजवा पाय डावीकडे न्या आणि मान वळवून उजवी कडे बघा. अशा प्रकारे याच क्रमात उलट करा. 4 ते 5 वेळा दोन्ही बाजूने ह्याचा सराव करा.  
 
फायदे- 
हे योग कंबरेच्या चरबीला कमी करण्याचे काम करते. या शिवाय हे बद्धकोष्ठता आणि गॅस च्या त्रासाला दूर करून किडनी, लिव्हर, आतड्या आणि स्वादुपिंड निरोगी ठेवण्यात मदत करते. 
 
* योगाचे पॅकेज -
या वरील चरण शिवाय आपण वृक्षासन,ताडासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, आंजनेय आसन आणि वीरभद्रासन देखील करू शकतो. पण हे एखाद्या योग शिक्षकांच्या सल्लानुसार करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती