हे 5 योगासन करतील महिलांचे त्रास कमी

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात महिलांना कोणते न कोणते आजार उद्भवतात. औषधोपचार करून देखील त्रास कमी होत नाही परंतु या त्रासांचा उपाय योगासनांमध्ये आहे जे करून आपण आरोग्याशी निगडित त्रासापासून दूर राहू शकता.चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ते योगासन.
 
 
1 केसांची गळती साठी -शीर्षासन 
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपण चटईवर बसा. बोटांना एकमेकात इंटरलॉक करून त्यावर डोकं ठेवा.पाय हळूहळू वर करून बोटांना इंटरलॉक करा.शरीराचे संपूर्ण वजन डोक्यावर टाका. 2 ते 3 मिनिटे याच अवस्थेत राहून सामान्य अवस्थेत या. हे असं भिंतीच्या साहाय्याने देखील करू शकता. दररोज हे आसन केल्यानं केसांच्या गळतीची समस्या दूर होईल.
 
2 मायग्रेन साठी -अनुलोम -विलोम -
अनुलोम विलोम केल्यानं फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा चांगला राहतो.यामुळे शरीराच्या आणि मेंदूच्या पेशींना अधिक ऑक्सिजन मिळते. या मुळे नैराश्य,मायग्रेन, श्वासाशी निगडित त्रास,रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. 
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पद्मासनात बसावं. नंतर उजवी नाकपुडी किंवा नासाग्रा बंद करून डाव्या नासाग्रा ने श्वास घ्या.ही प्रक्रिया किमान 10 मिनिटे पुन्हा करा.असं केल्यानं काहीच मिनिटात डोकेदुखी कमी होईल.
 
3 तणावासाठी -ध्यान -
ध्यान किंवा मेडिटेशन साठी मांडी घालून बसा. नंतर डोळे बंद करून कंबर ताठ ठेवा. दीर्घ श्वास घ्या. इच्छा असल्यास आरामासाठी गाणे देखील लावू शकता. जेणे करून लक्ष विचलित होऊ नये. दररोज ध्यान केल्यानं मन शांत, शरीर निरोगी आणि नैराश्यापासून सुटका मिळतो.
 
4 थॉयराइडसाठी -कुंडलिनी योग -
हे केल्यानं फुफ्फुस उघडते आणि थॉयराइड सारख्या समस्येपासून सुटका होते. या शिवाय हे संधिवात आणि पायाशी निगडित त्रासाला देखील दूर करते. हे आसन करण्यासाठी पायाची फुली करून बसा. दोन्ही हात नमस्कारेच्या मुद्रामध्ये करा. हे लक्षात ठेवा की पाठीचा कणा ताठ असावा.नंतर दोन्ही डोळे मिटून ॐ ॐ  चा जाप करा नंतर श्वासाच्या हालचालीकडे लक्ष द्या. जेणे करून आपण आरामदायी स्थितीमध्ये येता. 
 
5 मासिक पाळीच्या तक्रारीसाठी -अधोमुख श्वानासन-
हे आसन केल्यानं मासिक पाळीच्या वेळेस होणारी वेदना, पोटातून येणारी कळ,अनियमित मासिक पाळी सारख्या समस्येपासून सुटका मिळते.हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसून हात जमिनीवर ठेवा. आता हात आणि पाय व्ही आकारात पसरवून शरीराला वर उचला. हे आसन करताना पाठीचा कणा सरळ ठेवा. दररोज किमान 1 मिनिटे तरी हे आसन करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती