स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट आहे हे योगासन

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:14 IST)
महिलांच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हेच कारण आहे की आज प्रत्येक स्त्री कोणत्या न कोणत्या  आजाराने वेढलेली आहे. ह्याचे प्रमुख कारण चुकीची जीवनशैली देखील आहे. काही स्त्रिया छोट्या छोट्या समस्येसाठी औषध घेतात परंतु जास्त औषध घेतल्यानं शरीरावर आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत काय करावं की आपली समस्या देखील नाहीशी होईल आणि काही त्रास देखील होणार नाही . या साठी प्रत्येक समस्यांचे समाधान आहे योग.  या मुळे आपण आपल्या आरोग्याच्या समस्या सोडवू शकाल तसेच दीर्घ काळ निरोगी देखील राहू शकाल. स्त्रियांसाठी असेच काही खास योगासन आहे जे केल्यानं त्यांच्या समस्या दूर होतील. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 आजाराचा काळ आहे सूर्य नमस्कार-
सूर्य नमस्कार केल्यानं हाड बळकट होतात ताण,बद्धकोष्ठता कमी करत, नियमित मासिक पाळी होते, मनाची एकाग्रता वाढवते, त्वचेला सुंदर करण्यात मदत मिळते. सूर्य नमस्काराच्या 12 अवस्था आहेत जे केल्यानं स्त्रिया फिट आणि तंदुरुस्त राहतात.  या शिवाय हे गरोदर महिलांसाठी देखील फायदेशीर आहे.  
 
2 पीसीओडी -कपालभाती
हे आसन केल्यानं स्त्रियांमध्ये होणाऱ्या  PCOD च्या त्रासापासून वाचता येऊ शकत. हे वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यात देखील मदत करत.कपाल भाती श्वासाची प्रक्रिया आहे जे डोकं आणि  मेंदूच्या कार्यांना पुनरुज्जीवित करते. या साठी ध्यान मुद्रेत बसून डोळे बंद करा आणि शरीराला सैल सोडा. या नंतर हळुवार पणे श्वास घ्या आणि सोडा. सुरुवातीला हे किमान 30 वेळा करा. नंतर हळू-हळू 100 -200 पर्यंत करा. 
 
3  पाठ आणि कंबर दुखी साठी -मकरासन
आज बहुतेक स्त्रियांना कंबर आणि पाठ दुखीचा त्रास होतो, ज्या साठी त्या औषध घेतात. परंतु आपण मकरासन करून देखील या त्रासापासून मुक्त होऊ शकता. या साठी  हनुवटीला  जमिनीला स्पर्श करून आपल्याला सरळ झोपायचे आहे.नंतर हातांना हनुवटीवर ठेवा. श्वास घेत पायाला दुमडा आणि श्वास सोडत पाय सरळ करा. आता ही प्रक्रिया दोन्ही पायावर करा.
 
4 चमकणारी त्वचेसाठी -सर्वांगासन 
हे आसन केल्यानं आपली त्वचा उजळणारच नाही तर मुरूम, गडद मंडळे आणि अँटी एजिंग या सारख्या समस्या देखील दूर होतील. या साठी पाठीवर झोपा आणि श्वास ओढत हळूहळू पाय वर उचला. दोन्ही हात कोपऱ्यापासून कंबरेपर्यंत दुमडून कंबरेला धरून ठेवा. या स्थितीमध्ये संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर असावा.तसेच, खांद्यापासून कोपऱ्या पर्यंतचा भाग फरशीला लावून ठेवा.हनुवटीला छातीला लावण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत किमान 30 सेकंद राहा. नंतर श्वास सोडत पुन्हा सामान्य स्थितीत या. 
 
5 लठ्ठपणा कमी करत -नौकासन 
जर आपण देखील वाढत्या वजनाला घेऊन काळजीत आहात तर हे योग आपल्या समस्येचे समाधान करेल सर्वप्रथम आकाशाकडे तोंड करून पाठीवर सरळ झोपा. हातांना कंबरेजवळ लावून ठेवा, आणि हात जमिनीकडे ठेवा. हळू-हळू मान उचला आणि त्याप्रमाणे आपले पाय देखील उचला आणि होडीचे आकार घ्या. या मुद्रेत सुमारे  25 ते 30 सेकंद तसेच राहा. हे आसन केल्यानं वजन नियंत्रणात राहत आणि चरबी जलदगतीने बर्न होते.      
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती