खांदा आणि पाठीचे दुखणे बरे करण्यासाठी हे व्यायाम करा

बुधवार, 31 मार्च 2021 (16:32 IST)
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक आपल्या घरूनच काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करत आहे. सतत लॅपटॉप आणि कॉम्पुटरवर बसून काम करत असताना खांदे आणि पाठीत वेदना आणि थकवा जाणवणे सारखे त्रास होतात. या साठी काही सोपे व्यायाम आहेत जे केल्याने आपण या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.चला जाणून घेऊ या.  
खांदा आणि पाठीच्या वेदनेसाठी कोणते व्यायाम करावे हे सांगत आहे डॉ.चंद्रशेखर विश्वकर्मा, हे फिजिओथेरपिस्ट आणि योग प्रशिक्षक आहे.
 
खांद्याच्या दुखण्यासाठी व्यायाम- 
* सर्वप्रथम दोन्ही हात डोक्याच्या वर नेत ताणून घ्या.
* दोन्ही हात कोपऱ्यापासून दुमडून बोट खांद्यावर ठेवा आणि खांद्यांना वर्तुळाकार घड्याळीच्या दिशेने आणि घड्याळीच्या उलट दिशेने फिरवायचे आहे.
* दोन्ही खांदे वर-खाली पुढे मागे करायचे आहे. 
* डोकं उजवीकडे डावी कडे, वाकवायचे आणि गोल फिरवायचे आहे. 
 
पाठीच्या दुखण्यासाठी व्यायाम- 
* सरळ बसून किंवा उभारून दोन्ही हाताचे बोट फुल्ली करून धरून ठेवा. नंतर दोन्ही हात खांद्याच्या समोर न्या आणि डोकं वाकवा.असं केल्याने पाठीत ताण येईल. 
* उशीवर डोकं ठेऊन दोन्ही हाताचे बोट फुल्ली करून हात सरळ उभे ठेवा. 
* पाय अंतरावर ठेवा. हात न दुमडता शरीराचा वरील भाग आळी-पाळीने दुमडा. 
* लक्षात असू द्या की कोपरा आणि मनगट दुमडायचे नाही.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती