लिव्हर ज्याला आपण यकृत नावाने ओळखतो. एखाद्या स्पंजाप्रमाणे शरीराचा नाजूक अवयव आहे. हा नाजूक अंग खराब झाला तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर प्रभाव करतो. वेळीच या वर उपचार केले नाही तर ही समस्या गंभीर देखील होऊ शकते. अखेर लिव्हरच्या आजाराची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर उपचार काय आहेत वेबदुनियाच्या पाठकांसाठी मेदांता मेडिसिटी गुडगावचे प्रसिद्ध लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.प्रशांत भांगी सांगत आहे. जाणून घेऊ या.
लिव्हर खराब होण्याची कारणे-
डॉ. भांगी सांगतात की लिव्हरचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. 70 टक्के प्रकरणे,हेपेटायटिस,हेपेटायटिस बी,आणि सी मुळे होतात. भारतात हा आजार हेपेटायटिस सी मुळे होतो. जास्त आणि दीर्घ काळात मद्यपान केल्याने लिव्हर खराब होतो. मुलांमध्ये हा आजार जीन आणि एंझाइम च्या दोषांमुळे होतो.
लक्षण -
डॉ. भांगी म्हणतात की सुरुवातीच्या काळातच लक्ष दिले तर या आजारावर उपचार शक्य आहे. शेवटच्या अवस्थेमध्ये तर औषधे काम करत नाही. अशा परिस्थतीत लिव्हर प्रत्यारोपण करणे हाच एक पर्याय असतो. ते म्हणतात की पायात सूज येणं,पोटात पाणी तयार होणं,रक्ताच्या उलट्या होणे,अंतर्गत रक्तस्त्राव होणे, असे लक्षणे आहे, जे लिव्हरच्या आजार होण्याची लक्षणे आहेत.
* कसे टाळावे-
डॉ. भांगी म्हणतात, की खराब जीवनशैली मुळे,माणसामध्ये फॅटी लिव्हर ची समस्या उत्पन्न होते. आपल्या जीवन शैली मध्ये सुधारणा करून या साठी सकाळ संध्याकाळ दोन-दोन किमी पायी चालून या समस्ये पासून मुक्त होऊ शकतो. फास्ट फूड,तळकट आणि गरिष्ठ,मसालेयुक्त अन्न खाऊ नये. हे टाळले तर लिव्हर चांगले आणि निरोगी राहील. लिव्हर प्रत्यारोपण करण्याची वेळच येणार नाही.
* लिव्हर चा कर्करोग-
डॉ. भांगी म्हणतात, की 90 टक्के प्रकरणांमध्ये लिव्हर चा कर्करोग लिव्हरच्या खराबी मुळे होतो. 10 टक्के प्रकरणे असे असतात जे सामान्य यकृत ट्युमर चे असतात.ते म्हणतात की लिव्हर प्रत्यारोपण केल्याने लिव्हरचा कर्करोग देखील बरा होतो. या साठी जागरूक राहण्याची गरज आहे. जेणे करून लोकांमध्ये नैराश्य येऊ नये.
* स्वस्त उपचार-
तंत्रज्ञानासह उपचार देखील महाग झाले आहेत, मग सामान्य माणसाला या वर स्वस्त उपचार कसे मिळेल. या वर डॉ. भांगी म्हणतात,की लिव्हर प्रत्यारोपणाला या पूर्वी सुमारे 18 ते 21 लाख खर्च होत होते, आता देखील एवढेच खर्च होतात. लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कार्पोरेट रुग्णालयात केली जाते. शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नाही. शासकीय सहकार्या शिवाय स्वस्त उपचार शक्य नाही.
* काय खावे- लिव्हरला बऱ्याच काळ निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीसह खाणे-पिणे देखील चांगले असावे. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या वापराव्या, पालक,ब्रोकोली,पानकोबी,मोहरी,मुळासह मोड आलेले मुग,गहू,या गोष्टी वापरावे. आहारात लसूण आणि आलं नियमितपणे वापरावे.