पावसाळा जेव्हा आल्हादायक असतो तेवढा तो काही गोष्टींसाठी तोटा देखील असतो. पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसेच स्वयंपाकघरात ठेवलेले मीठ देखील पावसाळ्यात ओले होते.ओल्या मीठाचा वास येऊ लागतो, तर त्याची चवही खराब होते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही मिठाचा ओलावा दूर करू शकता.
मीठाचा बॉक्स ओलसर जागी ठेवू नका
मीठ कधीही ओल्या जागी ठेवू नका. यामुळे मिठात ओलावा असण्याची शक्यता वाढते. स्वयंपाकघरात मीठ नेहमी कोरड्या जागी ठेवू नका. ओल्या हातांनी कधीही मीठ बाहेर काढू नका, अन्यथा मीठ लवकर ओले होईल.