टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या 11 व्या दिवशी मंगळवारी भारताच्या पुरुष हॉकी संघाला बेल्जियमविरुद्ध 2-5 असा पराभव स्वीकारावा लागला. दिवसाच्या पहिल्या सामन्यात भालाफेकपटू अन्नू राणी अॅथलेटिक्स मधील अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यापासून वंचित राहिली. शॉट पुटर ताजिंदरपाल सिंग तूर पात्रता फेरीसह टोकियो 2020 च्या मोहिमेची सुरुवात करणार. कुस्तीमध्येही सोनम मलिकला महिलांच्या 62 किलो गटात पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. आशियाई रौप्यपदक विजेती मंगोलियाच्या कुस्तीपटूकडून सोनम हरली. मंगोलियन कुस्तीपटूचा उपांत्यपूर्व फेरीतील पराभव झाल्यानंतर सोनमही रेपेचेजमधून बाहेर पडली.
कुस्तीमध्ये सोनम मलिक महिलांच्या 62 किलो गटात पहिल्या फेरीत पराभूत झाली. मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सोनमचा पराभव केला. एका वेळी सोनम आघाडीवर होती, पण मंगोलियन कुस्तीपटूने पुनरागमन करत स्कोअर 2-2 ने बरोबरीत आणला. यानंतर बोलोरतुयाला दोन तांत्रिक गुण मिळाले आणि ती विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाली.