भारतीय हॉकी टीमचा बेल्जियमकडून उपांत्य फेरीत पराभव

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (09:22 IST)
भारतीय हॉकी संघाचा टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत बेल्जियमच्या संघाकडून पराभव झाला आहे. बेल्जियमनं भारतावर 3 गुणांनी मात केली. सामानाअखेरीस भारत आणि बेल्जियमची गुणसंख्या 2-5 अशी होती. या पराभवामुळे भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे.
 
उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कांस्य पदकाची आशा कायम आहे. कांस्य पदकासाठी भारताला आणखी एक सामना खेळण्याची संधी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणही भारत विरूद्ध बेल्जियममधील उपांत्य फेरीतील हॉकीचा सामना पाहत असल्याचे ट्विटरवरून सांगितले होते. भारतीय संघाचा अभिमान व्यक्त करत मोदींनी शुभेच्छाही दिल्या होत्या.
 
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला गेल्या 41 वर्षांमध्ये पदकांनी हुलकावणीच दिलेली आहे. उपांत्य फेरीत बेल्जियमचं आव्हान भारताला पेलता आलं नाही. त्यामुळे आता कांस्य पदकासाठी भारताला लढावं लागेल.
 
टोकियोमध्ये भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडविरोधात 3-2 असा विजय मिळवून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. पण पुढच्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7-1 असा भारताचा धुव्वा उडवला आणि भारतीय संघाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता भारताची गाडी रुळावरून उतरेल, असंही वाटायला लागलं होतं. पण मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या पराभवातून धडा घेत स्वतःची कामगिरी सुधारत नेली आणि आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर भारताने स्पेनला 3-0 अशा फरकाने, मागच्या ऑलम्पिकमधील विजेत्या अर्जेन्टिनाला 3-1 ने,
 
जपानला 5-3 अशा फरकाने हरवत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. भागताने गट फेरीतील सामन्यांमध्ये इतकी चांगली कामगिरी केल्याचं गेल्या चार दशकांमध्ये माझ्या पाहण्यात आलेलं नाही. यानंतर भारताने उप-उपांत्य सामन्यात ब्रिनटाल 3-1 अशी मात देऊन उपांत्य सामन्यात स्थान मिळवलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती