सिंधूचे लक्ष्य नंबर 1

Webdunia
नवी दिल्ली- इंडिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. तिच्या करिअरमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे आणि आता तिचे लक्ष्य नंबर एक वर असेल.
 
इंडिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीपूर्वी स्पनेची कॅरोलिना मारिन क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर होती. इंडिया सुपर सीरिजमध्ये प्रत्येक सामन्यागणिक खेळाडूंच्या गुणवारीत वाढ होत जाते. त्यानुसार ही स्पर्धा जिंकून सिंधूच्या खात्यात 9200 गुणांची भर पडली, तर मारिनला 7800 गुण मिळाले.
पुढील लेख