स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने व्हेनेझुएला आणि बोलिव्हियाविरुद्धच्या दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता सामन्यांसाठी अर्जेंटिना राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. 37 वर्षीय मेस्सी घोट्याच्या दुखापतीमुळे अलिकडच्या सामन्यांमधून बाहेर होता.
कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला दुखापत झाल्यामुळे शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये खेळता आलेला नाही. अर्जेंटिना 18 गुणांसह दक्षिण अमेरिकन पात्रतामध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर कोलंबियाचे 16 गुण आहेत तर उरुग्वेचे 15 गुण आहेत.