तब्बल 1 तास 51 मिनिटे चाललेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात पहिल्या सेटमध्ये क्रोएशियाच्या मरिन चिलीच आपले वर्चस्व कायम राखले. या सेटमध्ये चिलीच याने चपळाईने व आक्रमक खेळ केला.दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये चिलीच याने सिमॉनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस रोखत हा सेट 6-1 असा सहज जिंकून सामन्यात 1-0अशी आघाडी घेतली. हा सेट 28मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये सामन्यात पिछाडीवर असलेल्या सिमॉन याने जबरदस्त कमबॅक करत दुसऱ्याच गेममध्ये चिलीचची सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-0अशी आघाडी घेतली. सिमॉनच्या ताकदवान ग्राउंडस्ट्रोक व सर्व्हिसेसमोर अनुभवी चिलीच याची खेळी निष्प्रभ ठरली. यानंतर सिमॉन याने चौथ्या गेममध्ये चिलीचची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सिमॉन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.सिमॉन याने पहिल्या, सातव्या गेममध्ये चिलीचची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 अशा फरकाने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाउल पुढे टाकले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी:
मरिन चिलीच(क्रोएशिया)(1) पराभूत.वि. जिल्स सिमॉन(फ्रांस) 6-1, 3-6, 2-6
पुण्याहून अभिजित देशमुख