तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी

कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली आहे. यात महाराष्ट्र ने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीत बलाढ्य सेनादलावर मात केली असून  विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे . महाराष्ट्रला जवळपास ११ वर्षांच्या कालावधीनंतर  विजेतेपदाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र संघ हा  रिशांक देवाडीगाच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. महाराष्ट्र कबड्डीच्या  तरुण संघाने यंदा अनुभवी सेनादलाच्या संघावर अंतिम सामन्यात ३४-२९ अशी मात केली आहे. संघाचा कर्णधार रिशांक देवाडीगाने  चढाईदरम्यान केलेला खेळ हा महाराष्ट्राच्या विजयात महत्वाचा भाग ठरला आहे.
 
महाराष्ट्रचा हा सामना अंतिम फेरीत सेनादल विरुद्ध कमालीचा एकतर्फी होईल असा अंदाज व्यक्त केला गेला  होता. यामध्ये  सेनादलाचा संघ पूर्वीपासून आक्रमक चढाई ,तितक्याच मजबूत बचावासाठी ओळखला जातो. मात्र यावेळी  सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले गेले आहे, खेळात  पहिल्या सत्रापासून सामन्यावर महाराष्ट्र ने  आपलं वर्चस्व ठेवायला सुरुवात केली होती. निलेश साळुखेंने पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केली होती. यानंतर त्याला सोबत देत  कर्णधार रिशांक देवाडीगा ,नितीन मदने यांनी आपल्या खेळात  सेनादलाच्या बचावफळीला खिंडार पाडल होते. मात्र दुसरीकडे  सेनादलाकडून अनुभवी नितीन तोमर ,अजय कुमार यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या सत्रात १७-१२ अशी आघाडी घेतली होती. योग्य नियोजन करत महाराष्ट्र संघाने आपला विजय मिळवला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती