राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने 20 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 57 पदके जिंकली आहेत.
भारताच्या लक्ष्य सेनने चमत्कार केला आहे. लक्ष्य सेनला सुवर्णपदक जिंकण्यात यश आले आहे. लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला होता. मात्र त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन करत 2-1 असे सुवर्णपदक जिंकले. 20 वर्षीय लक्ष्य सेनने भारताच्या झोळीत मोठा विजय टाकला आहे.
लक्ष्य सेनने बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या आंग जे योंगचा 19-21, 21-9, 21-16 असा पराभव केला. यासह त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 20 वे सुवर्णपदक आहे. त्याचबरोबर आज भारताने बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे.
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी यांच्याशी होईल.