लव मेकिंगचे असले फायदे, माहीत आहे का?

लव मेकिंग अर्थात सेक्‍स आनंद तर देतंच याचे अनेक फायदे देखील आहेत. आरोग्यासाठी हे कसे फायद्याचे आहे जाणून घ्या: 
 
डोकेदुखी पासून मुक्ती
वेदना दूर करणारे एंडोर्फिन आणि लव हार्मोन ऑक्‍सीटोसिन हे दोन हार्मोन सेक्स दरम्यान रक्त पेशींतून स्त्रावित होतात. हे दोन्ही हार्मोन शरीराला आराम देतात आणि यामुळे डोकेदुखी पासून मुक्ती मिळते.
 
फ्लूवर उपचार
सेक्‍स केल्याने इम्‍यून सिस्‍टम चांगलं राहतं. हे शरीरात बॅक्टिरिअल संक्रमणाला झुंज देण्यासाठी अँटीबॉडी रूपात इम्युनोग्लोबुलिन तयार करतं.
 
हार्ट अटॅकचा धोका कमी
रिसर्चप्रमाणे दररोज सेक्स केल्याने इतर लोकांच्या तुलनेत हृदय संबंधित आजार होण्याची शक्यता कमी असते.
 
डिप्रेशन दूर करण्यास मदत
डिप्रेशनमुळे सेक्‍समध्ये रुची कमी होते परंतू सेक्समुळे मूड चांगलं होतं हे देखील तेवढेच खरे आहे. सेक्सने डिप्रेशन कमी केलं जाऊ शकतं.
 
स्नायूंवर प्रभाव
सेक्‍सदरम्यान एंडोर्फिन आणि ऑक्‍सीटोसिन हार्मोन रिलीज होतात ज्याने वेदना दूर होते. सेक्समुळे स्नायू आणि सांधेदुखी पासून मुक्ती मिळते.
 
मूत्र गळतीपासून बचाव
सेक्‍समुळे पेल्विक भागाचे स्नायू मजबूत होतात. याने मूत्र गळतीपासून बचाव होतो.
 
प्रोस्‍टेट आरोग्यासाठी योग्य
अध्ययनात हे उघडकीस आले आहे की सतत वीर्यस्‍खलनने प्रोस्‍टेटच्या आरोग्यात सुधार होतो आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
 
निद्रानाशावर उपचार
सेक्स दरम्यान रिलीज होणारे एंडोर्फिन शरीराला आराम देतात आणि ऑक्‍सीटोसिन हार्मोन कोर्टिसोलच स्त्राव थांबवतं ज्याने ताण कमी होतं. यामुळे चांगली झोप येते.
 
ब्रेस्‍ट कॅसरचा धोका कमी होतो
ऑक्‍सीटोसिन हार्मोन आणि डीएचईए रिलीज होत असल्यामुळे स्तन कर्करोगाचा धोका कमी होतो. 
 
चमकदार त्वचा
सेक्‍समुळे रक्‍तप्रवाह व्यवस्थित राहतं आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघतात ज्यामुळे त्वचा उजळते.
 
लव मेकिंगमुळे केवळ आपसात नातं मजबूत होत नसून आरोग्यदृष्ट्या याचे खूप फायदे आहे. तर सेक्स ओझं समजून नव्हे तर आरोग्यासाठी मनोरंजक व्यायाम आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती