असा घालवा बायकोचा राग

विवाहित पुरुषांच्या जीवनातील सर्व सामान्य बाब काय आहे? होय! बरोबर ओळखले, बायकोचा राग झेलणे. अनेक नवर्‍यांना बघ़न लगेच कळून येतं की यांना जेवण्यासोबत रागदेखील वाढण्यात येत आहे. पत्नीशी भांडण झाल्यास ते त्याच दिवशी मिटावे, सोबतच तिला शांत करणे सोपे तर नाही पण अशक्यही नाही कारण येथे आम्ही देत आहोत काही फनी उपाय ज्याने पत्नीचा राग शांत करता येईल, तेही पटकन:
सर्वात पहिला मंत्र हा आहे की आपली चूक नसली तरी लगेच स्वीकार करून घ्या: की हो बाई मी चुकलो...आता आपण सुरक्षित आहात.
 
ती रागाने बघत असल्यास प्रेमाने उत्तर द्या. तिला प्रेमाने ज्या नावाने हाक मारत असाल ती हाक देत म्हणा तू हसताना अगदी दीपिका पादुकोणसारखी दिसते, जरी आपण तिचे हसण्यामुळे घाबरत असाल.
 
जेवणात स्वाद नाही तर चिडू नका, उलट कौतुक करा. एवढेच नव्हे तर जेवल्यानंतर किचन आणि डाइनिंग टेबलही स्वच्छ करुन द्या, तर युद्धाचे कारणच राहणार नाही.
 
कधी चुकून म्हणू नका की मला हे खायचे नाहीये. 4-5 दिवस उपाशी राहण्याची ताकद असल्यास हिंमत करू शकता, कारण त्यानंतर देवही आपल्या मदतीला धावू शकत नाही.
 
मला तुझी ही गोष्ट अजिबात पसंत नाही, असे बोलणे म्हणजे स्वत:च्या कपड्यांना स्वत: आग लावण्याएवढे धोकादायक आहे. तू अगदी बरोबर आहे. तू म्हणशील ती पूर्व दिशा असे वाग मग बघा सगळ्या दिशा पूर्व होतील की नाही.
 
मी बाहेर जायला तयार झाली, मेकअप अगदी सूट करत नसेल तरी आपल्यावर आहे राग सांभाळणे. म्हणा अगदी परीसारखी दिसतेय. मेकअप किंवा कपडे वाईट दिसताय असे म्हटले तर आदल्या दिवशी पार्टीला पोहचाल हे जाणून घ्या.
 
लग्नानंतर मित्रांबरोबर वेळ घालवता म्हणून बायकोला राग येण्यापूर्वीच तिला फिरायला घेऊन जा. मॉलमध्ये तिच्या मागे पिशव्या घेऊन फिरावे लागेल पण हो डोक्या फिरण्यापेक्षा मॉलमध्ये फिरणे अधिक योग्य ठरेल.
 
आपल्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी टिपटॉप बनून राहा. तिच्यासाठी धनदेवता होऊन जा, अर्थातच शॉपिंग, मूव्ही, माहेरच्यांना गिफ्ट्स. एवढे केले की गंगेत घोडे न्हाले समजा.
 
व्हॉट्स अॅप किंवा फेसबुकवर टाईमपास करण्याऐवजी तिचे मनोरंजन करा नाहीतर आपण मनोरंजन व्हाल. हो पण ती फोनमध्ये बिझी असल्यास तिला मुळीच छेडू नका.
 
मॉलमध्ये फिरताना किंवा एखाद्या पार्टीमध्ये दुसर्‍या मुलींचे कौतुक करत बसू नका. अशी तारीफ करणे म्हणजे स्वत: त्या जीवाशी खेळताय 'मौत का कुआँ' खेळताय असे समजा. इकडे तिकडे बघण्याऐवजी असे म्हणा... तारीफ करुं क्या उसकी, जिसने तुझे बनाया...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती