sex माणसाची लैंगिक इच्छा आणि शक्ती वाढवण्यासाठीचे नैसर्गिक मार्ग शोधण्यासाठी हल्ली सातत्याने संशोधन होत आहे. डाळिंबाचा रस हा 'व्हायग्रा'सारखेच काम करू शकतो हे अलिकडेच सिद्ध झालेले आहे. आता टरबूज (कलिंगड)ही असाच परिणाम करू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे हे फळ याबाबतीतही उपयुक्त आहे.
भारतीय वंशाच्या एका संशोधकाच्या नेतृत्वाखाली हे संशोधन अमेरिकेत झाले आहे. त्यात संशोधकांना असे दिसून आले की कलिंगड हे व्हायग्रासारखे काम करू शकते. माणसाची सेक्स ड्राईव्ह वाढवण्यासाठीचे सर्व गुण कलिंगडमध्ये आहेत. कलिंगडमधील घटक रक्तपेशींवर व्हायग्रासारखेच परिणाम करतात. 'टक्सास एअँडमच्या फ्रुट अँड व्हेजिटेबल इम्प्रुव्हमेंट सेंटरचे संचालक डॉ. भीमनगौडा पाटील यंनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले, की कलिंगड हे साधारण फळ नाही. त्यात शरीराच्या दृष्टीने अतिशय प्रभावशाली नैसर्गिक घटक आहेत. त्यात 92 टक्के पाणी असते आणि कॅलरी शून्य टक्के असते. त्याच्या फायद्याची यादी बरीच मोठी आहे. त्यापैकी सर्वात मोठा लाभ लैंगिक क्षमता वाढवण्याचा आहे.