मुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने त्या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असतांना या तरुणीला ‘टिक टॉक’चे व्यसन नसून यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले असल्याची माहिती समोर आली आहे. थेट स्वर्गात कसे जाता येईल याचा ध्यास या मुलीला लागला होता.
श्रावणी घोलप (१५) असे तरूणीचे नाव आहे. या मुलीला युट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागले होते. थेट स्वर्गात कस जाता येईल, याचे व्हिडिओ ती सातत्याने यूट्यूबवर पाहायची आणि त्यातूनच तिने एक अघोरी प्रयोग केला आणि त्यात तरुणीचा मृत्यू झाला. तुमच्या आत्म्याला बाहेर बोलवायचे. तसेच काही काळ त्याच्याशी बोलायचं आणि मग पुन्हा आत्मा शरीरात शिरतो, असलं काहीतरी भलतं सलतं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.