प्रयाग कुंभच्या ब्रँडिंगसाठी अमिताभचे चार लघु चित्रपट

प्रयागराज कुंभाशी महानायक अमिताभ बच्चन यांच्या देखील आठवणी जुळलेल्या आहेत. या आठवणींसह त्यांनी प्रयागकुंभ 2019 चा प्रचार सुरू केला. राज्य सरकाराच्या आग्रहावर बिग बीने निःशुल्क चार लघु चित्रपट तयार केले आणि कुंभाच्या प्रचारासाठी शक्य तितकी मदत करण्याचा वादा केला आहे. या चित्रपटात संदेश आहे की खरंच! अद्भुत आणि अद्वितीय असतं प्रयाग कुंभ.
 
पर्यटन विभागाच्या अपर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी मुंबईत अमिताभ बच्चन यांच्याशी भेट घेतली होती आणि त्यांना चित्रपट तयार करण्याचा आग्रह केला होता. पर्यटन मंत्री डॉ. रीता बहुगुणा जोशी यांनी देखील अमिताभ यांना पत्र लिहून एड फिल्म बनवण्याचा आग्रह केला होता. गीतकार प्रसून जोशी आणि अमिताभ बच्चन यांनी चार लघु चित्रपट तयार केले आहे.
 
यात त्यांनी प्रयागकुंभ बद्दल आपल्या मनाची गोष्ट प्रस्तुत केली आहे. अमिताभ यांनी पूर्वीच म्हटले होते की ते स्वत: प्रयाग येथील असून कुंभासाठी त्याच्या मनात असलेली भावना प्रकट करतील. सोशल मीडियावर हे चित्रपट पसंत केले जात आहे.
 
अमिताभ म्हणतात की माझं लहानपण तर प्रयागमध्ये गेलं. कुंभाशी किती तरी आठवणी जुळलेल्या आहेत. पहाटे चार वाजता उठून लोकं संगम स्नान करण्यासाठी पोहचत असे. आधी त्रिवेणीची माती अंगावर चोळायची आणि मग डुबकी मारायची. मंत्र तर पाठ नव्हते परंतू ओठ हलवत राहायचे. पोंटून पुल बघून विचार करायचो की हे तयार कसे झाले असावे, एवढा लोकांचा भार कसं झेलत असेल, मोठे झालो तेव्हा विज्ञान कळलं.
 
बिग बी सांगतात, मला दोन- तीन वेळा कुंभ मेळ्यात सामील होण्याची संधी मिळाली. जेव्हा जेव्हा तेथे गेलो तेथून आश्चर्यचकित होऊन परत आलो. एवढ्या लोकांची भक्ती आणि आस्था... सोबत... एकाच जागेवर... मानवतेचा हा महोत्सव खरंच अद्भुत असतो. आपल्या माहीत आहे की युनेस्कोने देखील कुंभला मानवतेची अमूर्त सांस्कृतिक धरोहर मानले आहे. आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.
 
अमिताभ म्हणतात की प्रयागमध्ये एकापेक्षा एक अद्भुत वस्तू बघायला दिसतात. जसे तेथील हनुमानाची प्रतिमा. हनुमानाची प्रतिमा तर खूप बघितल्या असतील परंतू प्रयागराज सारखी नाही, विश्रांती करत असलेले हनुमानजी आहेत. संगम जवळ किल्ल्याजवळ आहे हे मंदिर. बांध हनुमान नावाने प्रसिद्ध आहे जागा. लहानपणी आम्ही खूप वेळा जात असो, येताना दूध-जलेबी खायचो. खूप प्रसिद्ध आहे तेथील दूध जलेबी.
 
बिग बी प्रमाणे कुंभमध्ये आस्था तर आहेच विज्ञान देखील आहे. आकाशात विशेष नक्षत्र मिळतात तेव्हा धरतीवर कुंभ असतं. सूर्य आणि चंद्रमा मकरमध्ये प्रवेश करतात तेव्हाच बृहस्पतिचं वृषभमध्ये प्रवेश होतं आणि तेव्हा वेळ येते कुंभाची. त्या काळात संगममध्ये स्नान केल्याने मस्तिष्क, शरीर आणि आत्मा यात नवीन ऊर्जेचा संचार होतं, आत एक सकारात्मक ऊर्जा भरते आणि चित्त एकदम प्रसन्न होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती